नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , धानोरकरांच्या निधनाने अजित पवार झाले भावूक – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

धानोरकरांच्या निधनाने अजित पवार झाले भावूक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत ऑनलाईन

                   पत्रकारांशी बोलताना अजित पवार


बारामती : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे आजारपणामुळे निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर राज्यस्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. यावेळी एक किस्सा शेअर करत अजित पवार यांनी धानोरकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
मी विरोधी पक्षनेते पद स्वीकारले तेव्हा पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दौरा केला होता. तेव्हा धानोरकर स्वत: माझ्यासोबत शेतक-यांच्या बांधावर फिरत होते. राष्ट्रवादीचे चंद्रपुरात कार्यालय नाही हे त्यांनी ऐकले होते. माझे स्वत:चे कार्यालय आहे ते तुम्ही वापरावे, मी पवार साहेबांना मानतो. आपण एकत्र काम करायला हवे, असे ते म्हणाले होते.
मित्रपक्षाला आपले कार्यालय देणारा दिलदार नेता. धानोरकर यांच्या जाण्यामुळे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे आहे. मी तिथे फिरताना पहायचो, त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. आंदोलन करायचे तेव्हा आपली भूमिका यश येईपर्यंत रेटण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवार म्हणाले.
तसेच, धानोरकर माझ्याकडे राष्ट्रवादीकडून खासदारकीचे तिकिट मिळावे यासाठी आले होते. मी त्यांना असे का करताय, तुम्ही काय तयारी केली आहे, असे विचारले होते. तेव्हा धानोरकर यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्याला लोकसभेचे तिकिट मिळेल, तयारीला लागा असे आदेश दिले होते.
परंतु, जागावाटपामध्ये ती जागा भाजपाला गेली. यामुळे मी सर्व तयारी केलेली आहे, मला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी ज्याच्याकडे लोकसभेची जागा जाईल तिथून उमेदवारी हवी आहे, असे ते म्हणाले होते, असे अजित पवार म्हणाले.
काँग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती, परंतु धानोरकर यांनी दुस-या पक्षातून येत विजय मिळविला होता. मी उपमुख्यमंत्री असताना त्यांची आणि त्यांच्या आमदार पत्नीने आणलेली सर्व कामे केली. माझ्या चंद्रपुराचा कायापालट व्हायला हवा अशी त्यांची भूमिका होती. नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही, अशी भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा